पुणे शहर

ताम्हिणी घाटात घडलेल्या भीषण अपघातात पुण्यातील उत्तमनगर परिसरातील सहा तरुणांचा मृत्यू….

पुणे – कोकणात फिरायला जाताना ताम्हिणी घाटात झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील सहा तरुणांचा मृत्यू झाला आहे.
माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. हे सहा जण नवीन घेतलेल्या थार गाडी कोकणात फिरायला चालले होते. थार गाडी पाचशे फूट दरीत कोसळून घडलेल्या हा अपघात एवढा होता की सहा जणांचा त्यात मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर दोन दिवसांनी ही घटना पुढे आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात मृत्यू पावलेले सहा तरुण पुण्यातील कोंढावे धावडे गावातील असून मृत्यू झाला असून ते तरुण पुण्यातील रहिवासी आहेत. साहील साधू गोटे (24), शिवा अरुण माने (19), ओंकार सुनील कोळी (18), महादेव कोळी (18), प्रथम रावजी चव्हाण (24), पुनीत सुधाकर शेट्टी (20) अशी अपघातातील तरुणांची नावे आहेत. हे सर्वजण कोंढावे धावडे, कोपरे, उत्तमनगर भागात राहणारे तरुण आहेत.

Img 20250508 wa00015038950216212096978

या मंगळवारी दिवसभर या तरुणाचा संपर्क होत नव्हता त्यामुळे पुणे आणि माणगाव पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर या तरुणांचा शोध सुरु झाला. या तरुणाचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाटात आढळल्याने ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने या तरुणांचा शोध घेतला गेला. घटनास्थळी माणगाव पोलीस, SVRSS, शेलार मामा रेस्क्यू टीम आणि RESQ रेस्क्यू पथकाने रोपच्या सहाय्याने खाली उतरून तरुणांचा शोध सुरू केला.

कठडा तुटला असल्याच्या ठिकाणी अपघात झाल्याचे स्थानिकांना समजले. त्या ठिकाणी शोध घेण्यात आला.  थार एमएच 14 एचडब्यू 7575 असा आहे. रेस्क्यू पथकाने रोपच्या सहाय्याने खाली दरीत उतरुन या तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर यात सहाही तरुणांचा मृ्त्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये