पुणे शहर

आज कर्वेनगरमधील सभेत अजित पवार काय बोलणार ? प्रभाग 30 कर्वेनगर-होम कॉलनी व प्रभाग 32 वारजे-पॉप्युलरनगर मधील राजकीय वातावरण तापणार..

पुणे : पुणे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज कर्वेनगर मध्ये जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेतून अजित पवार काय बोलणार आणि कोणावर निशाणा साधणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कर्वेनगर भागात होणाऱ्या अजित पवार यांच्या सभेमुळे प्रभाग 30 कर्वेनगर, होम कॉलनी व प्रभाग 32 वारजे पॉप्युलरनगर  भागातील वातावरण चांगलेच तापणार आहे.

पुणे महापालिका निवडणूकीत भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर होम कॉलनी आणि प्रभाग क्रमांक 32 वारजे पॉप्युलरनगर या दोन प्रभागात जोरदार लढत होणार आहे. अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर थेट टिका करत निवडणूकीत रंगत आणली आहे. भाजप नेत्यांनी देखील अजित पवार यांच्या वर पलटवार केले आहेत.

Img 20251125 wa01782121520512185783132

प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी स्वप्नील दुधाणे, विजय खळदकर, संगिता बराटे, निवेदिता जोशी आणि प्रभाग क्रमांक 32 वारजे पॉप्युलर नगर मध्ये  दीपाली धुमाळ, सचिन बराटे, किरण बारटक्के, अश्र्विनी कांबळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची जाहीर सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित करण्यात आली आहे. 

कर्वेनगर होम कॉलनी भागामध्ये स्वप्निल दुधाने यांच्या मातोश्री नगरसेविका होत्या. त्यांच्या माध्यमातून या भागात विकासकामे झालेली आहेत. आणि आगामी काळात अनेक प्रकल्प राबविणार आहे. स्वप्निल दुधाणे, विजय खळदकर, संगिता बराटे, निवेदिता जोशी यांनी देखील विविध कामा व्दारे तसेच लोकांचे प्रश्न सोडविले आहेत. त्यामूळे जनतेशी संपर्कातील आम्ही उमेदवार असून आम्ही लोकांचा विश्वास संपादन केला आहे.आणि जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने या भागातील नागरिक आमच्या पाठीशी असून आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. 

पुणे महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून कर्वेनगर होम कॉलनी आणि वारजे पॉप्युलर नगर या दोन्ही प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार करीत आघाडी घेतली आहे. वारजे पॉप्युलर नगर प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करुन भाजपची उमेदवारी मिळवली आहे. मात्र या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. दीपाली धुमाळ यांनी नगरसेवक पदाच्या कार्यकाळात विविध विकास कामे, प्रकल्प उभे केले आहेत. तसेच दीपाली धुमाळ, सचिन बराटे, किरण बारटक्के, अश्र्विनी कांबळे या उमेदवारांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामूळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये