बावधन-भुसारी कॉलनी प्रभागात भाजप उमेदवार पुन्हा विजयी चौकार मारणार – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

प्रभाग क्रमांक १० बावधन-भुसारी कॉलनी मध्ये भाजपा-आरपीआय (ए) युतीच्या उमेदवारांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : पुणे महापालिका निवडणूकीत प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहेत. असा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० (बावधन-भुसारी कॉलनी) मध्ये भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युतीचे अधिकृत उमेदवार किरण दगडे पाटील, रुपाली सचिन पवार, अल्पना गणेश वरपे आणि दिलीप तुकाराम वेडे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पदयात्रेत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सहभागी झाले होते यावेळी ते बोलत होते.या पदयात्रेला मतदारांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला

मोहोळ म्हणाले, या भागात भाजप नगरसेवकांनी अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न सोडविले आहेत. चांदनी चौक उड्डाण पूला सहीत अनेक नवे प्रकल्प या भागात पूर्ण झाले आहेत. आगामी काळातही नवे प्रकल्प होणार आहेत.त्यामूळे या भागातील नागरिकांनी भाजप उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. प्रभागाच्या सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठी भाजपाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मोहोळ यांनी यावेळी केले
यावेळी उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधताना चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याची विनंती केली.मतदारांनी या पदयात्रेला उत्स्फूर्त साथ दिली असून, प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी भाजपाच्या उमेदवारांवर विश्वास टाकला आहे.येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात भाजपा-आरपीआय युतीला मोठा विजय मिळेल, असा विश्वास उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.



