पुणे शहर

ज्येष्ठ पत्रकार शेखर कानेटकर यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ पत्रकार शेखर कानेटकर (वय ७३) यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांच्या मागे विवाहित मुलगा, सून असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
दै. लोकमतमध्ये ते अनेक वर्षे वृत्तसंपादक पदावर कार्यरत होते. त्यानंतर काही काळ ते प्रभातचे संपादक होते. तसेच दै. तरुण भारतमध्ये त्यांनी काम केले होते.

सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक विषयांचा त्यांंचा चांगला अभ्यास होता. त्यावर ते विविध ठिकाणी ते लिखाण करत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या उपचार सुरू होते. 

Img 20260222 wa00065926623401269940689

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये