पुणे शहर

पोलिसांनी जातीचे दाखले, वैद्यकीय प्रमाणपत्र समाजकल्याण विभागाला उपलब्ध करुन द्यावेत : लोंढे

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक

पुणे : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. कागदपत्रांअभावी पीडितांना अर्थसहाय्य देण्याची प्रकरणे प्रलंबित राहू नयेत यासाठी पोलीस विभागाकडे असलेले जातीचे दाखले, वैद्यकीय प्रमाणपत्र समाजकल्याण विभागाला उपलब्ध करुन द्यावेत, अशा सूचना समितीचे सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिल्या.

Image editor output image 1758013595 17828225794482212489401592562025
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक

यावेळी समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. या समितीद्वारे अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ बाबत जाणीव- जागृती होण्यासाठी जातीय सलोखा वृद्धींगत होण्यासाठी तालुकास्तरावर कार्यशाळा घ्याव्यात, पोलीस विभागाने वस्तुस्थिती तपासून आवश्यक त्या ठिकाणी गुन्हे दाखल करावेत, उच्च न्यायालयातील प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रतिनिधी नियुक्त करावा व पुढील बैठकीत उच्च न्यायालयातील प्रकरणांची संख्या सादर करावी. गुन्ह्यांची संख्या जास्त असलेल्या तालुक्यात संयुक्तिक बैठका घेऊन ६० दिवसांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्याची कार्यवाही करावी, असे लोंढे यांनी सांगितले.

Fb img 17803875442192531368419001118856

बैठकीत तालुकानिहाय प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. तसेच उपस्थित तक्रारदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये