पुणे शहर

नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या पाठपुराव्याला यश;बाणेर-बालेवाडी मुख्य चौकांमध्ये वाहतुक कोंडीतुन मिळणार नागरिकांना दिलासा 

बाणेर-बालेवाडीतील मुख्य चौकांमध्ये 4 दिवसांत सिग्नल यंत्रणा बसवणार..

पुणे : बाणेर-बालेवाडी येथील मुख्य रहदारीच्या ममता चौक, राधा चौक, ननावरे चौक, बाणेर स्मशानभुमी चौक, दसरा चौक या चौकांमध्ये वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने सिग्नल यंत्रणा बसवणे करीता स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी वाहतुक पोलीस आयुक्त (वाहतुक शाखा) यांच्याकडे मागणी केली होती. सिग्नल यंत्रणा बसविण्याच्या मागणीची तातडीने दखल घेवुन पोलिस आयुक्त वाहतूक विभाग व पुणे महानगरपालिका विद्युत विभाग यांच्या माध्यमातुन येत्या ४ दिवसात या मुख्य चौकांमध्ये नविन सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

आज बालेवाडी येथील ममता चौक येथे वाहतूक पोलिस निरीक्षक श्री.जगदाळे साहेब, पुणे मनपा विद्युत विभागाचे अभियंता प्रल्हाद पवार यांच्या समवेत नविन बसविण्यात येणाऱ्या सिग्नल यंत्रणा व वाहतुक नियोजनाची प्रत्यण पाहणी केली. 

Addaheading 20260922 174920 00004820041175559346531

नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले, सिग्नल यंत्रणा बसविण्याच्या मागणीची तातडीने दखल घेवुन मा.पोलिस आयुक्त वाहतूक विभाग व पुणे महानगरपालिका विद्युत विभाग यांच्या माध्यमातुन येत्या ४ दिवसात या मुख्य चौकांमध्ये नविन सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे. निश्चितच या सिग्नल यंत्रणेमुळे या मुख्य रहदारीच्या चौकांमध्ये वाहतुक कोंडी सुटेलच परंतु याठिकाणी कार्यरत असलेल्या ट्राफिक वॅार्डन यांच्यावरील देखील ताण काही प्रमाणात कमी होईल. 

प्रभागातील वाहतुक कोंडी त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे, अतिक्रमणे यासारखे प्रश्न सोडवुन वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मी व माझे सहकारी नगरसेवक बाबुराव चांदेरे कटिबद्ध आहोत. असेही बालवडकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये