पुणे शहर

ज्येष्ठ चित्रकार विलास कुलकर्णी यांच्या ‘गुरुकुल’चे जलरंगातील निसर्गचित्रांचे पुण्यात प्रदर्शन..

प्रसिद्ध चित्रकार चारुहास पंडित यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे : ज्येष्ठ चित्रकार विलास कुलकर्णी आणि त्यांच्या ‘गुरुकुल’मधील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या जलरंगातील निसर्गचित्रांचे सहावे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे २०, २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध चित्रकार आणि ‘चिंटू’ या लोकप्रिय व्यंगचित्रमालेचे जनक चारुहास पंडित यांच्या हस्ते होणार आहे.

Addaheading 20261012 112603 0001

प्रदर्शनात विलास कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या विद्यार्थ्यांनी जलरंग माध्यमातून साकारलेली विविध निसर्गचित्रे कलारसिकांना पाहता येणार आहेत. रविवार, २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विलास कुलकर्णी यांचे जलरंगातील निसर्गचित्रनिर्मितीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे.

प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत असून, चित्रकलेची आवड असणाऱ्या तसेच जलरंग चित्रशैलीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या कलारसिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये