पुणे शहर

पुणेकरांना महापालिकेच्या करांमध्ये १५ टक्के सवलत – महापौर मुरलीधर मोहोळ यांची घोषणा

पुणे : कोरोना काळात महापालिकेवर विश्वास ठेऊन ज्या नागरिकांनी १ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या काळात केवळ ज्या निवासी मिळकत धारकांनी संपूर्ण मिळकत कर भरला आहे, अशा निवासी मिळकत धारकांना सण २०२१-२२ च्या बिलांमध्ये शासनाचे कर वगळून सर्व करांमध्ये १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.15% discount in municipal taxes for Pune residents – Mayor Murlidhar Mohol’s announcement 

Img 20210219 wa0013

मोहोळ म्हणाले,प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या पुणेकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पुणेकरांनी घ्यावा. ही सवलत जे निवासी मिळवत धारक संपूर्ण मिळकतकर दि. १ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यानच्या कालावधीत भरतील त्यांना ही सवलत लागू होणार आहे. या योजनेत महानगरपालिकेच्या सर्व साधारण कर, सफाई पट्टी, वृक्ष कर, रस्ता कर, जलनिस्सारण कर, मलनिस्सारण कर, अग्निशमन कर, शिक्षण उपकर आणि विशेष सफाई कर आदी करांचा समावेश आहे. या योजनेचा फायदा पुणेकरांनी घ्यावा

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये