क्षत्रिय मराठा सांप्रदायिक दिंडी क्र ९७ च्या विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल माणिक दुधाने यांचा कर्वेनगर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
कर्वेनगर : ह.भ.प. भाऊसाहेब परांडे महाराज व ह.भ.प माणिक दुधाने यांची क्षत्रिय मराठा सांप्रदायिक दिंडी क्र ९७ च्या विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल हिंगणे बु !! कर्वेनगर ग्रामस्थ व रत्ना कट्टा ग्रुप च्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला . Manik Dudhane was felicitated on behalf of Karvenagar villagers for being selected as the trustee of Kshatriya Maratha Sampradayik Dindi No. 97.
यावेळी महाराष्ट्र वारकरी महामंडळ पुणे शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चंद्रकांत महाराज वांजळे, अखिल भारतीय महामंडळ संपर्क प्रमुखपदी बाळासाहेब वांजळे, महाराष्ट्र वारकरी महामंडळ संघटकपदी ह.भ.प पोपट बराटे, यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बाळासाहेब बराटे, पोपट फेंगसे, अशोक पानेकर, विठ्ठल बराटे, आनंद तांबे तसेच एकनाथ फेंगसे, बबनराव बराटे, शिवणे गावाचे माजी सरपंच रामदास दांगट, गोऱ्हेकर दिंडीचे दिनकर वांजळे, तेजल दुधाने, प्रवीण दुधाने व कर्वेनगर मधील ग्रामस्थ उपस्थित होते. कर्वेनगर मधील भैरवनाथ मंदिराच्या सभामंडपात हा सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी बोलताना परांडे महाराज म्हणाले की, समाजातील सर्वसामान्यांना नामस्मरणाचे महत्व पटवून देऊन स्वतःच्या ठिकाणी असलेल्या देवाचे स्मरण करून जीवनामध्ये सुखी कसे रहावे याबाबत श्री दत्त महाराजांच्या आशीर्वादाने कार्य सुरू आहे. कर्वेनगर ग्रामस्थांनी केलेल्या या सन्मानानं बाबत मी कृतज्ञता व्यक्त करतो. वांजळे महाराज म्हणाले की, माझं मुळ गाव अहिरे असले तरी माझी कर्मभूमी कर्वेनगर आहे. हा सत्कार म्हणजे माझ्या कुटुंबातील लोकांनी केलेला सत्कार आहे.
माणिक दुधाने म्हणाले, कर्वेनगर ग्रामस्थांबरोबर माझे जुने ऋणानुबंध आहेत. राजकारणा बरोबर पारमार्थिक वाट धरल्यामुळे मी आज उभा आहे. कर्वेनगर ग्रामस्थांनी आजपर्यंत मला खूप साथ दिली आहे भविष्यातही त्यांनी अशीच साथ द्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पानेकर यांनी केले. सत्कारमूर्तींचा परिचय बाळासाहेब बराटे यांनी करून दिला तर विठ्ठल बराटे यांनी आभार मानले.