शिवजयंती निमित्त कोथरुडमध्ये रेखाटले छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील पहिले भव्य भित्तीचित्र..

पुणे : शिवजयंतीचे औचित्य साधून श्रीमान योगी प्रतिष्ठान च्या वतीने कोथरूड येथील ‘सकाई प्लाझा’ या इमारतीच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे डच चित्रकाराने काढलेले दुर्मिळ चित्र ७० फूट बाय ३० फूट अशा भव्यदिव्य आकारात रेखाटण्यात आले असून हे चित्र पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. The first magnificent mural of Chhatrapati Shivaji Maharaj drawn in Kothrud on the occasion of Shiva Jayanti

श्रीमान योगी प्रतिष्ठान कडून गेल्या ९ वर्षांपासून कोथरुड मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दरवर्षी वर्षी प्रतिष्ठाणच्या वतीने भव्य दिव्य देखावे उभे करून महाराजांचे शौर्य आणि विचार लोकांपर्यत पोहचवून शिवजयंती साजरी केली जाते. गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य आरमर तयार केले होते. तर यंदाच्या वर्षी कोथरूडच्या सकाई प्लाझा या इमारतीवर महाराज यांचे तब्बल ७० फूट बाय ३० फूट असे भव्य दिव्य भित्ती चित्र रेखाटण्यात आले आहे.
हे भित्ती चित्र निलेश खराडे या चित्रकाराने अवघ्या ३ दिवसात तयार केले आहे. हे महाराजांचे सर्वात जुने चित्र असून महाराजांचे भित्ती चित्र कोथरूडच्या सौंदर्यात आणखी भर पाडणार आहे. हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबविण्यात आला असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले.






