कोथरुड

कोथरुड मतदार संघातील शासकीय, सार्वजनिक, व्यावसायिक इमारतींचे सेफ्टी फायर ऑडीड करण्याची राष्ट्रवादीची मागणी… 

कोथरुड :  शहरातील एम.जी.रोड वरील “फॅशन स्ट्रीट ला भयंकर आग लागल्याची घटना ताजी आहे. अशा आगींच्या घटनांमुळे जीवित व वित्त हानी होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोथरुड विधानसभा मतदारसंघातील सरकारी, सार्वजनिक व खाजगी (व्यावसायिक)इमारतींचे सेफ्टी फायर ऑडीड करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी केली आहे. NCP demands safety fire audit of government, public and commercial buildings in Kothrud constituency

या संदर्भातील निवेदन दुधाने यांनी महापालिकेच्या मुख्य अग्निशामक अधिकारी यांना दिले आहे. एम जी रोड वरील फॅशन स्ट्रीट ला लागलेल्या आगीत संपूर्ण बाजार पेठ जळुन खाक झाली. हजारो कुंटुबाचे उदर निर्वाहाचे ठिकाण या आगीमध्ये उध्वस्त झाले. अश्या घटना पुढे वाढता उन्हाळा (ओव्हर हिटींग) पाहता तसेच शॉर्ट सर्किटने होण्याचे प्रमाण लक्षात घेता कोथरुड विधानसभा मतदार संघातील बाणेर, पाषाण, कोथरुड, एरंडवणा, कर्वेरोड येथील गर्दीची ठिकाणे असणाऱ्या सरकारी व खाजगी (व्यावसायिक) इमारतीचे सेफ्टी फायर ऑडिट होणे आवश्यक असल्याचे दुधाने यांनी म्हंटले आहे.

Img 20210319 wa0097

सेफ्टी फायर ऑडिट केल्यास भविष्यातील संभाव्य आगीच्या घटना आपल्याला टाळता येतील त्यामुळे
आपल्या यंत्रणे मार्फत पुढील योग्य ती सेफ्टी फायर ऑडिट करण्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये