महाराष्ट्र

14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, आज-उद्या CM घोषणा करतील या मंत्र्यांची माहिती

मुंबई : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अशी माहिती दिली आहे की राज्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. आज किंवा उद्या मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, मुख्यमंत्री याबाबत अंतिम एसओपी करत आहेत. गरीब लोकांना काय दिलासा देता येईल याबाबत सरकार विचार करत असल्याचं ते म्हणाले.There is no alternative but a 14-day lockdown, the CM said in a statement

Img 20210413 wa0027
Img 20210413 wa0241

कोरोनामुळे आज राज्यभर अत्यंत साधेपणाने गुढीपाडवा साजरा केला जात आहे. बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईतील घरी साधेपणाने पाडवा साजरा केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अशी प्रार्थना केली की, ‘गेलं वर्ष आणि हे वर्ष देखील कोरोना मध्ये गेलं आहे. राज्य संकटात आहे. राजकारणात चढ उतार होत असतात पण राजकारण हे लोकांसाठी करतो असतो. कोरोनाचे संकट दूर होवो.’

Img 20210413 wa0031
Img 20210412 wa0056

कोरोनाबाधित देशात सर्वाधिक अधिकृत रुग्ण संख्या महाराष्ट्राची   आहे. त्यामुळे भविष्यातील कोविड 19 संसर्ग विस्फोट टाळण्यासाठी राज्य सरकार सलग काही दिवस कडक लॉकडाऊन लावण्याच्या पवित्र्यात आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकार 2.0 लॉकडाऊनची नियमावली दोन दिवसांत जाहीर करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, राज्यात सलग दोन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन घोषित होणार आहे.

Img 20210413 wa0009

गेल्या वर्षीप्रमाणे अती कडक लॉकडाऊन न लावता, सर्वसामन्य नागरिकांना जीवनावश्यक गोष्टींसाठी सूट देत आणि हातावर पोट असणाऱ्या अति-गरीब वर्गातील नागरिकांना, काही प्रमाणात आर्थिक मदत करण्यासंदर्भातही नियोजन राज्य सरकार करत असल्याची माहिती मिळत आहे. कोविड 19 संसर्गाची ही दूसरी लाट पहिल्या लाटेच्या तिप्पट तीव्रतेची असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे राज्यातील कोविड 19 संसर्गाची दूसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज निर्माण झाली आहे.

Img 20210413 wa0237
Img 20210413 wa0003
Img 20210413 wa0244

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये