महाराष्ट्र

बलात्कार आणि भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंना अजिदादांवर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. – विजय डाकले

पुणे : बलात्कार आणि भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंना अजिदादांवर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही.ढोबळेंची अवस्था राजकारणातल्या विझण्या अगोदर फडफडणा-या दिव्यासारखी असे मत राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग पुणे शहराध्यक्ष विजय डाकले यांनी व्यक्त केले.

डाकले म्हणाले,काल पंढरपुर येथे भाजपाचे विधानसभेचे उमेदवार श्री. समाधान अवताडे यांच्या प्रचाराची सभा झाली. या सभेत बोलताना भाजपाचे नेते माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत पातळी सोडुन टिका केली. राष्ट्रवादी पक्षामध्ये असताना ज्या पवार साहेब आणि अजितदादांमुळे लक्ष्मणराव ढोबळे यांना आमदारकी आणि मंत्रीपद मिळाली त्याची जान न ठेवता आज अजितदादांसारख्या लोकप्रिय आणि कर्तृत्ववान नेत्यावर ढोबळे टिका करत आहेत. सत्तेची फळे खायला
मिळत होती तोवर पवार चांगले होते, परंतु सत्ता जाताच सत्तेचे लालची ढोबळे जिकडे भेळ तिकडे खेळ या नितीप्रमाणे भाजपामध्ये गेले. ढोबळे यांच्यावर बलात्कार आणि स्वताच्या शिक्षण संस्था, सुत गिरणी, डाळ मिल मधील केलेले भ्रष्टाचार यांचे आरोप आहेत.

IMG 20210413 WA0011
IMG 20210413 WA0244

बलात्कार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपातुन सुटण्यासाठी भाजपामध्ये गेलेले ढोबळे हे भाजपामध्ये दुर्लक्षित
असुन फक्त नेते मंडळींसमोर हुजरेगिरी करणे एवढेच काम त्यांच्यावर सोपवले गेल्याचे दिसते. अजितदादांवर टिका करण्या अगोदर ढोबळेंनी स्वतावरचे बलात्काराचे आणि राजश्री शाहु महाराज शिक्षण संस्था, सुत गिरणी, डाळ मिल यामधले भ्रष्टाचार आठवावेत मगच अजितदादांवर टिका करावी. शेवटपर्यंत पाठीशी राहिलेल्या दिन दलित, बहुजन वर्गाशी ढोबळे यांनी प्रतारणा केली असुन जातीयवादी संघाच्या वळचणीला बांधले गेले आहेत लवकरच ते उघडे पडतील. सामाजिक न्याय विभागाच्या पुणेशहर कार्यकारणीच्या झालेल्या बैठकीमध्ये ढोबळे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला. असेही डाकले यांनी सांगितले.

IMG 20210412 WA0007
IMG 20210413 WA0015
IMG 20210413 WA0029
FB IMG 1618244711146
Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close