गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीविरुद्ध कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निषेध आंदोलन..


कोथरुड : “बहुत हुई महंगाई की मार ……” असे आश्वासन देत केंद्रातील सरकारने २०१४ साली सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर सत्तारुढ पक्षाने आपल्या आश्वासनावर फारकत घेत गेल्या सात वर्षांत गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने केंद्र सरकारच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कोथरुड विधानसभा मतदारसंघच्या वतीने कर्वे पुतळा चौकात मुक आंदोलन करण्यात आले. NCP protests in Kothrud against gas, petrol and diesel price hike.
याप्रसंगी स्वप्निल दुधाने, नितीन कळमकर, हर्षवर्धन मानकर, ज्योती सूर्यवंशी, गोविंद थरकुडे, प्रमोद शिंदे, निलेश शिंदे, संतोष ढोक, शुभम माताळे, संतोष चव्हाण, कृतिका राजेमहाडिक, चैत्राली काळे, राखी श्रीराव, सुषमा ताम्हाणे, रेखा नानेकर, नंदनी बडदे, ऋतुजा देशमुख, राजश्री म्हस्के,
तसेच अलका भिसे, सारिका चोरघडे, सई सोनवणे, किशोर शेडगे, प्रतिक पुंड, आकाश गोळे, अमित गोडांबे, रुपेश काळे, आकाश पवार, श्रीकांत बालघरे, नंदनी पानेकर, शशिकांत जगताप, लखन सौदागर, सचिन शिंदे, आशिष शिंदे, पुष्कर भिलारे, दिनेश तांबे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना संसर्ग लक्षात घेता सामाजिक अंतराचे पालन करुन आंदोलनात सहभाग घेतला. आधीच कोरोना त्यात वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचा आरोप करत विविध घोषणा फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.



