पुणे शहर

पुण्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ठरला देशात सर्वाधिक !

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशासमोर रुग्णसंख्या आणि कोरोनाच्या बाबतीत पुणं सर्वाधिक चिंतेचा विषय बनलेलं होतं. त्यात पुण्यानं आता चांगल्या अर्थानं देशासमोर आदर्श उभा केला आहे. पुणे शहराचा कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा देशात सर्वाधिक ठरला आहे. कोरोनाच्या संकटात केलेल्या उपयायोजना आणि त्यानंतर लसीकरण तसेच इतर प्रयत्नांमधून पुण्याला हे यश मिळवता आलं आहे.(Recovery rate of corona patients in Pune became the highest in the country!)

पुणे शहराचा कोरोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट हा शुक्रवारी 97.15 टक्क्यांवर पोहोचल्याचं समोर आलं आहे. राज्यातच नव्हे तर देशात हा सर्वाधिक रिकव्हरी रेट आहे. परिणामी रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग हा 899 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. पुण्यानं केलेल्या उपययोजनांमध्ये लसीकरणाचा मोठा वाटा होता. पुण्यात लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. त्यामुळंदेखिल परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलं आतापर्यंत पुण्यात 11 लाख 22 हजार 811 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Img 20210522 wa0207

कोरोनाची दुसरी लाट आल्याचं मार्च महिन्याच्या अखेरीस स्पष्ट झालं होतं. त्याच्या आधीपासूनच जवळपास महिनाभर तशी चर्चा आणि संकेतही मिळत होते. पण ज्या वेगानं या काळात रुग्णांची संख्या वाढायला लागली तो सर्वांसाठी चिंतेचा विषय होता. देशात तर महाराषट्रानं सगळ्यांच्या चिंता वाढवल्या होत्या. कारण देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णांचं प्रमाण असलेल्या पहिल्या दहा जिलह्यांमध्ये सात ते आठ राज्यातले होते. त्यामुळं परिस्थिती अत्यंत गंभीर होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये