पुणे शहर

म्हणूनच परिसराचा चांगल्या प्रकारे विकास ; लक्ष्मी दुधाने

कर्वेनगर :  “हेची थोर भक्ती आवडते देवा,  संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असु द्यावे समाधान” समाधान असल्यामुळेच आपल्या या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने  सुरू आहे असे मत नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी व्यक्त केले.

Img 20210705 wa0128

प्रभाग क्र.३१ कर्वेनगर – वारजे येथील श्रीराम सोसायटी मधील मुख्य चौकात लक्ष्मी दुधाने यांच्या संकल्पनेतून  विकसित केलेल्या सुशोभीकरण वास्तूचे लोकार्पण ज्येष्ठ नागरिक शेखर फडके यांच्या हस्ते आणि पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे कोथरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे, किशोर शेडगे, मनीष धुमाळ व श्रीराम सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पासलकर , पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Img 20210701 wa0256

स्वप्नील दुधाने म्हणाले, “कोणतेही विकास काम करत असताना तेथील नागरिकांचा सहभाग हा महत्वाचा असतो. गेल्या चार वर्षात मी बघितले की श्रीराम सोसायटीतील नागरिक कामांचा  पाठपुरावा मोठ्या प्रमाणात करतात, त्यामुळे आम्हालाही काम करायला आनंद मिळतो. तसेच परिसरातील विकास कामे मार्गी लागण्याबाबत तेथील ५० टक्के नागरिकांचे श्रेय असते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये