पुणे शहर

वारजेतील रसिक श्रोत्यांनी घेतला भक्तीसंध्या कार्यक्रमाचा आस्वाद ; वारजे हायवे परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन…

वारजे :  टाळ बोलें चिपळीला , आली कुठूनशी कानी, येई ओ विठ्ठले, सावळ्या विठ्ठला, विठू माझा लेकुरवाळा, अशी भक्ती गीते “अगा वैकुंठीच्या राया ” या भक्तीसंध्या कार्यक्रमात सादर झाल्याने वारजेकरांची एकादशीची संध्याकाळ संस्मरणीय ठरली. 

वारजे हायवे परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त माजी नगरसेवक व  शिक्षण मंडळ पुणे मनपाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ व विरोधी पक्षनेत्या  दीपाली धुमाळ यांच्या वतीने  आषाढी एकादशीच्या दिवशी  सुप्रसिद्ध  गायिका डॉ. अनघा राजवाडे प्रस्तुत “अगा वैकुंठीच्या राया “या भक्ती गीतांच्या ऑनलाईन, फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Img 20210721 wa0200

या कार्यक्रमाला जगभरातील रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.  ‘जय जय रामकृष्ण हरी ‘या विठ्ठल गजराने कार्येक्रमाची सुरवात करण्यात आली. कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात आनंदी, सकारात्मक  भाव भावनांचे वर्णन करणाऱ्या गीतांनी  रसिक श्रोते भारावून गेले.

Img 20210707 wa0004

अनाघा राजवाडे व अमोल मोरे यांनी टाळ बोलें चिपळीला,  आली कुठूनशी कानी , येई ओ विठ्ठले, सावळ्या विठ्ठला,  विठू माझा लेकुरवाळा, अरे कृष्णा अरे कान्हा, साईराम साईश्याम, मन लागो रे लागो रे गुरुभजनी, अवघे गरजे पंढरपूर, बाजे रे मुरलिया , अश्या अजरामर विठ्ठल गीतांची जणू रसिकांना पर्वणीच दिली.
    

“अवघा रंग एक झाला “या भैरवीने मैफिलीची सांगता करण्यात आली.  अशोक मोरे, अमोल मोरे, गीतांजली मोरे यांनी सुयोग्य साथसंगत केली. याप्रसंगी बाबा धुमाळ आणि विरोधी पक्षनेत्या, नगरसेविका दिपाली धुमाळ यांची विशेष उपस्थिती होती. संघाचे अध्यक्ष नंदकुमार बोधाई यांनी प्रास्ताविक केले तर सौ. दातार यांनी आभार मानले.

Img 20210721 wa0051
Img 20210721 wa0158
Img 20210721 wa0162
Img 20210721 wa0161

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये