पुणे शहर

नृत्योत्सव ३ उन्मेष संगीत नृत्योत्सवात शंभरहून अधिक नृत्यांगणा सहभागी

पुणे : अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद ‘ आणि ‘ शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था’ यांच्या वतीने भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचे संकीर्तन करण्यासाठी ‘ नृत्योत्सव उन्मेष’ या नृत्य आणि संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शास्त्रीय नृत्यकलेचे प्रतिनिधित्व करणार्या दहा संस्थांमधील शंभरहून अधिक नृत्यांगणा या नृत्योत्सवात सहभागी झाल्या होत्या. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, बांगलादेश निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘सत्यम शिवम सुंदर’चा उद्घोष करणारी भारतीय मानसिकता आणि तत्वज्ञान, उत्पत्ती, स्थिती आणि लय यावर भाष्य करणारे ‘शिवतांडव’, स्त्री शक्तीचा जयजयकार करणारा ‘महाकाली कपालिनी’, भारतमातेसमोर नतमस्तक होणारी ‘भारतांबा’, पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या कर्तृत्व यशस्वितेचे स्तवन, श्रीकृष्णाचे ‘कलिंगनर्तन’, बुद्धीची देवता गणेश आदी नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.

Img 20211105 wa0169

अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे. संस्थेचे प्रभारी योगेश गोगावले यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास DRDO महासंचालक (एसीई) प्रविणकुमार मेहता, REDE चे संचालक डॉ. व्हि. व्यंकटेश्वर राव, आरएनडी इंजिनिअरचे संचालक डॉ प्रदीप कुरुलकर, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, माजी एअर मार्शल भूषण गोखले,अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषदेचे अध्यक्ष जयंत इनामदार, महासचिव वीरेंद्र महाजनी, पदाधिकारी संजय बोरसे, नरेश कुमार गोयल, श्रीमती माया मटकर, काशिनाथ देवधर, नृत्य गुरु शमा भाटे,मनीषा साठे, सुचेता भिडे चाफेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये