पुणे शहर

याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ घेणार महत्वाचा निर्णय..

पुणे : pune city आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर उद्धभवलेल्या म्युकरमायकोसिस या योजनेचा समावेश मोफत उपचारांमध्ये केला होता. त्याच धर्तीवर पुणे शहरातील थॅलेसेमिया रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वकष योजना आखण्यासाठी प्रयत्न करणार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. यामुळे शहरातील थॅलेसेमिया रुग्णांना उपचारासाठी निश्चित मदत होईल,अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.

‘अविनाश कॅन्सर क्लिनिक, ‘डेसीमेट सी’, ‘संजीवन रुग्णालय आणि ‘जनकल्याण’ रक्तपेढी या संस्थांनी एकत्र येऊन थॅलेसेमिया रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत उपचार करण्याचा ‘रुधिर द लाइफलाइन’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचे उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

Img 20211105 wa0169

यावेळी अविनाश कॅन्सर क्लिनिकचे प्रमुख डॉ. अनंतभूषण रानडे, जनकल्याणचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी, संजीवनी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. मुकुंद पेनुरकर, मुंबई शाखेचे विनय शेट्टी व्यासपीठावर उपस्थित होते. बालरोग तज्ज्ञ व रक्तरोग तज्ज्ञ डॉ. लिझा बलसारा आणि रक्तरोग तज डॉ. श्वेता लुंकड यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला आहे.

मोहोळ म्हणाले, आपल्या घरातील एक मूल आजारी असेल तर संपूर्ण कुटुंब अस्वस्थ असतं. या आजारात स्वत:चं जीवन जगताना या मुलांना रोज संघर्ष करावा लागतोय. हजारो मुलांना नियमित रक्त संक्रमणाची गरज लागते. रोज त्यांना त्यासाठी खर्च लागतो. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांसाठी महापालिकेतर्फे वेगळी योजना राबविण्याचा प्रयत्न करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये