कोथरूडमध्ये बढेकर ग्रुपच्या “पुष्कर” या भव्य गृहप्रकल्पाचा शुभारंभ..

पुणे : बढेकर ग्रुपच्या कोथरुड मधील पौड रस्त्यावरील भुसारी कॉलनी येथील पुष्कर या सर्व सुविधांनी युक्त अशा भव्य गृहप्रकल्पाचा शुभारंभ भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला.
व्यावसायिकांसाठी ६०० फुटांचे फ्रंटेज, ४ मजली शॉप्स आणि ऑफिसेस, १२ मजली निवासी गृहरचना, चार मजली पार्किंग व सगळ्यात वरच्या मजल्यावर रिक्रीएशन फ्लोअर अशी पुष्कर या गृहप्रकल्पाची वैशिष्ठ्य आहेत.
यावेळी, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, प्रसिद्ध गायक महेश काळे, बढेकर ग्रुपचे केशव बढेकर, प्रविण बढेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, इमारतीचे रिडेव्हलपमेंट करताना नागरिकांचा बांधकाम व्यावसायिकावर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. आज या वर्षातील बढेकर ग्रुपच्या ११ व्या रिडेव्हलपमेंट गृहप्रकल्पाचा शुभारंभ होत असल्याने बढेकर ग्रुपने नागरिकांचा विश्वास संपादित केल्याचे दिसत आहे. नाते विश्वासाचे या त्यांच्या स्लोगन मधील शब्द त्यांनी खरा ठरवला आहे.




