पुणे शहर

पुण्याला कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका प्रशासनाने सतर्क रहावे….

पुणे : कोरोना साथीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन कोरोना व्हायरस ओमिक्रॉन व्हेरिएंट या नव्याने आढळलेल्या धोकादायक विषाणुबाबत प्रशासनाने सतर्कता बाळगावी, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.

कोविड-१९च्या अनुषंगाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कार्यवाहीचा आढावा घेण्याकरिता उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारी बैठक झाली. त्यात सहभागी होऊन आमदार शिरोळे यांनी विविध मुद्दे मांडले. कोरोनामुळे ज्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा नागरिकांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मृत व्यक्तिंच्या कुटुंबियांपर्यत पोहोचण्यासाठी मृत व्यक्तिंची यादी शासनाने लोकप्रतिनिधींनाही द्यावी, त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचण्यास शासनास मदत होईल, असे आमदार शिरोळे यांनी सुचविले.

कोरोनाच्या नव्या विषाणुचा धोका लक्षात घेता शिवाजीनगर येथील जंबो कोविड सेंटरचे इन्फ्रास्ट्रक्चर काढू नये ,असेही शिरोळे यांनी सांगितले.पुण्यातील कोरोना कंट्रोल मॉडेलचे डॉक्युमेंटेशन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आमदार शिरोळे यांनी दिली.

Img 20211105 wa0169

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये