पुणे शहर

चित्र-शिल्प संवाद महोत्सवातून उद्यापासून उलगडणार महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचा इतिहास…

बालगंधर्वमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि दीवा प्रतिष्ठानच्या वतीने  ८ ते १२ डिसेंबर दरम्यान महोत्सवाचे आयोजन

पुणे : देशाचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने आम्ही पुणे शहरामध्ये साजरा करत आहोत. या निमित्ताने चित्र-शिल्प संवाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व चित्रकार आणि शिल्पकार या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. ८ तारखेपासून १२ तारखे पर्यंत हा संपूर्ण सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केलेला आहे. चित्र-शिल्प संवाद हा कलाप्रेमींसाठी आगळी पर्वणी ठरणार आहे. तरी सर्व कलाप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन माजी उपमहापौर नगरसेवक दीपक मानकर आणि दीवा प्रतिष्ठानचे संस्थापक हर्षवर्धन मानकर, अध्यक्ष करण मानकर यांनी केले आहे.

मानकर म्हणाले, गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनामुळे कलाकारांना जे सहन कराव लागले आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर काही तरी एक वेगळेपण कलाकारांना आपण द्यावे या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. ८ डिसेंबरला पवार साहेबांचे मित्र उद्योगपती विठ्ठल मणियार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, अंकूश काकडे यांच्या उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन नाहीतर कलाप्रेमी मंडळीसाठीचा महोत्सव असणार आहे.

Img 20211207 wa00072165133909860442855

समाजामध्ये काम करत असताना पवार साहेबांचे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मोठे योगदान आहे. काटेवाडीच्या पाऊलवाटेवरून येऊन संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आणि समाजाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न आपल्या आयुष्यामध्ये केला.  तरी या संपूर्ण चित्र-शिल्प संवादाच्या नियोजनामध्ये पवार साहेबांचा सगळा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न देखील आम्ही मंडळी करणार आहोत.  युवकां इतके सामर्थ्य आणि तेवढी ऊर्जा त्यांच्यामध्ये आजही आहे. महाराष्ट्रात एवढा मोठा कुठलाही नेता आज पर्यंत झाला नाही भविष्यात देखील होणार नाही. यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श जपण्याचे काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सातत्याने केले.

काटेवाडी पाऊलवाटेवरून येणारा एक युवक त्यांनी हिमालयाला कधी गवसणी घातली आज पर्यंत देखील समजले नाही.  एवढ्या मोठ्या नेत्याचा वाढदिवस साजरा करत असताना आमच्या मध्ये देखील तोच उत्साह आहे. पवार साहेबांनी महाराष्ट्र व  देशाकरता मोठे योगदान दिलेले आहे आणि अशा नेत्याचा वाढदिवस साजरा करते वेळी कलाप्रेमींना देखील एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचा माझा प्रयत्न आहे.  कलेविषयी मला देखील प्रेम आहे आणि याच प्रेमाची शिदोरी उराशी बाळगून या कलाकारांच्या जीवनामध्ये कुठेतरी परिवर्तनाला व त्यांना योग्य न्याय द्यावा त्यांचा आनंद द्विगुणित करावा यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे.  सगळ्यांना नम्र विनंती आहे की, या उपक्रमाला आपण सगळ्यांनी भेट द्यावी. असे आवाहन ही मानकर यांनी केले आहे.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये