महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशन सुरू : ताज्या घडामोडी सिंहासन न्यूजवर

LIVE मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज, बुधवारपासून सुरू झाले आहे. या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी पाच दिवसांचा आहे. अधिवेशनात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे परीक्षांमधील गोंधळ, एसटी कर्मचाऱ्यांचा लांबलेला संप याबरोबरच ओबीसी आरक्षणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल. विरोधी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाने होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. आता या पदावर काँग्रेसचे संग्राम थोपटे किंवा अमिन पटेल यांची निवड होणे ही औपचारिकता उरली आहे. याचा केवळ निषेध नोंदवण्यापलीकडे विरोधकांच्या हाती काहीही राहिलेले नाही. तसेच विरोधकांच्या आरोपांना उत्तरे देताना त्यांच्यावरही प्रतिआरोप होतील, अशी अनेक प्रकरणे या अधिवेशनात समोर येण्याची शक्यता असल्याचे अनेक ज्येष्ठ मंत्री सांगत आहेत. त्यामुळे जेवढे विरोधक आक्रमक होतील, तितकेच सत्ताधारीही आक्रमकपणेच त्याचा सामना करण्याच्या तयारीत आहेत.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये