महाराष्ट्र

पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पुण्यातील शाळा एक फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पहिली ते आठवीपर्यंत शाळा अर्धा दिवस म्हणजे 4 तास असणार आहे. नववीपासून पुढील वर्ग पूर्ण वेळ भरतील अशी माहिती देण्यात आली आहे. करोना रुग्णसंख्या कमी राहिली तर पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा देखील पूर्णवेळ सुरु राहणार आहेत. 30 आणि 31 जानेवारी रोजी शाळांमधील स्वच्छता आणि इतर बाबी शाळा प्रशासनातर्फे केल्या जाणार आहेत.

लसीकरण कसे करायचे, याची माहिती शाळा चालक आणि संचालकांना कळवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ग्रामीण भागात 86 टक्के 15 ते 18 वयोगटातील लसीकरण झालं असल्याचे त्यांनी सांगितले.

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण केले जाणार आहे तसे आदेश निघणार आहेत. संस्था चालकांना तसे आदेश देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पुणे आणि नागपूर जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती 26 जानेवारी पूर्वी चिंताजनक होती पण ती आता सावरत असल्याचे ते म्हणाले. एसटी कर्मचारी कामावर येतील, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यांनी पगारवाढ दिली आहे आता कामावर यावे, असे आवाहन केले. एसटी शासनात विलीनीकरणाचा अहवाल न्यायालयात सादर केल्यावर न्यायालय योग्य तो निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

Img 20220123 wa0404

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये