हिंदुस्थानी भाऊसाठी भाजप मैदानात? मोहित कंबोज यांनी दिला आंदोलनाचा इशारा

मुंबई : हिंदुस्थानी भाऊची लवकरात लवकर सुटका झाली पाहिजे. जर असं झालं नाही, तर आम्ही सर्व आंदोलनात उतरू, असा इशारा भाजपचे मोहित कंबोज यांनी दिला आहे. गुन्हा दाखल करुन हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली, हे निदंनीय कार्य महाराष्ट्र सरकारनं केलं आहे, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.

दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊच्या सोशल मीडियावरील चिथावणीखोर वक्तव्याला प्रतिसाद देत मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उरतल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पांगवली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ नावाने प्रसिद्ध असलेल्या विकास पाठकविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली आहे. कोरोना काळात सगळे नियम धाब्यावर बसवत मुखपट्टीविना हजारो विद्यार्थी जमले होते. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या समोरही या विद्यार्थ्यांनी धुडगूस घातला होता.



