पुणे शहर

पुण्यात मास्क न घातल्यास 1 हजार रुपयांचा दंड, कोरोनाची नवी नियमावली जाहीर

पुणे : मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाचे रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पुण्यातील वाढता कोरोना लक्षात घेता शहरात मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबतची नियमावली जाहीर केली आहे. A fine of Rs 1,000 for not wearing a mask in Pune, new rules of Corona announced

राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद यासंह अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्सनुसार पुणे शहरात मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पुण्यात सलग दुसऱ्यांदा मास्क न घातलेल्या व्यक्तींकडून एक हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे.

IMG 20210116 WA0007

पुण्यात पहिल्यांदा एखादा व्यक्ती मास्क न घालता आढळल्यास 500 रुपये दंड करण्यात येईल. त्यानंतर पुन्हा तोच व्यक्ती जर मास्क न घालता आढळला, तर त्याच्याकडून 1 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे. यासाठी पुणे पोलिसांकडे आधीपासूनच व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक

दरम्यान राज्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा एकदा उद्रेक होऊ लागला आहे. काल (19 फेब्रुवारी) राज्यात 6 हजार 112 नव्या रुग्णांचे नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 44 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.48 टक्के इतका आहे. तर दुसरीकडे आज 2 हजार 159 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 19 लाख 89 हजार 963 इतकी झाली आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.32 टक्के इतके आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close