पुणे शहर

नऱ्हे परिसरातील ऑटो गॅरेजला भीषण आग; 10 वाहने जळून खाक

पुणे : नऱ्हे परिसरात असलेल्या अंबामाता मंदिराजवळील परफेक्ट ऑटो गॅरेजला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, गॅरेजमध्ये असलेली १० वाहने पूर्णत: जळून खाक झाली आहे. यामध्ये ४ चारचाकी वाहने आणि ६ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अस्पष्ट आहे.

Img 20231109 wa00224472945685943196081
Img 20221228 wa0001281293906176097910423568496031457580102742
Img 20230511 wa0002282296555721650380460122
Img 20231111 wa0004281292791598778819580777
Img 20230803 wa0004281298499086669704171738

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये