भुसारी कॉलनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व कोथरूड काँग्रेस आय यांच्या वतीने महिला बचत गटांचा संयुक्त मेळावा

पुणे : जेष्ठ नेते शरद पवार व काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भुसारी कॉलनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व कोथरूड काँग्रेस आय यांच्या वतीने भागातील महिला बचत गटांचा संयुक्त मेळावा आयोजित केला होता.
सदर मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार खडकवासला महिला उपाध्यक्ष प्रियंका करण तांबे व काँग्रेस आय पुणे शहर सरसिटणीस किशोर मारणे यांचे वतीने कोथरूड व भुसारी मधील सर्व कार्यकर्ते यांनी शुभेच्छा मंगल कार्यालय येथे आयोजित केला होता.कार्यक्रमाची प्रस्तावना प्रियंका तांबे यांनी केली सूत्र संचलन राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष सीताराम तोंडे पाटील यांनी केले.

सदर कार्यक्रमांस आमदार मोहन जोशी तसेच माजी सभापती पुजा पारगे,पुणे शहर महिला बचतगट अध्यक्षा वैशाली थोपटे,उपाध्यक्ष रूपाली शेलार, सोशल मीडिया अध्यक्षा,मनिषा भोसले, सूर्यकांत जाधव,अब्दुल तांबोळी, ईंद्रभान लांडगे, ययाती चरवड, ढोले डीडी, मीनल धनवटे व कोंग्रेसचे कोथरूड अध्यक्ष रवींद्र माझीरे, कानु साळुंके, दिनेश सुतार, निलेश वाघमारे,बंटी जाधव,आकाश देवकुळे, अपा साहेब कांबळे,हनुमंत राऊत,काळुराम कुदळे, चेतन आगरवाल ,किरण मारणे, हाजी शेख, लियाकत शेख,अंकुश आडसुळ, लखन कुराडे, हंसराज गायकवाड, दिपक तांबे, प्रतीक कासार,धनंजय झुरुगे,बनसोडे दादा, शितल चव्हाण, पुजा चव्हाण,व इतर कार्यकर्ते हजर होते.
या कार्यक्रमात बचत गट महिलांना एस. एस. सावंत यांनी मार्गदर्शन केले. तसेस श्री गोळे यांनी बँकिंग व लघु उद्योगाचे रजिस्ट्रेशन व इतर माहिती दिली.सदर कार्यक्रमात हजर महिलांना छोटी भेटावस्तु देण्यात आली.आमदार जोशी यांनी बचत गटांना मार्गदर्शन केले.किशोर मारणे यांनी सर्वांचे आभार मानले.









