कोथरूडमध्ये भाऊबीज निमित्त आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला आल्या एकत्र..मंत्री चंद्रकांत पाटील यांचे केले औक्षण

भाजपचे मंदार बलकवडे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
कोथरूड : भारतीय जनता पार्टी मंदार बलकवडे यांच्या वतीने दीपावलीचे औचित्य साधून भाऊबीज निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खिलारेवाडी, गावठाण, भालेकर चाळ, रजपुत वीटभट्टी, ढेरे चाळ, कवडे प्लॉट, प्लॉट नं १४ व १५ येथील स्थानिक महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्नेह, प्रेम आणि आपुलकीचे नाते दृढ करणारा हा भाऊबीजेचा सण मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या महिलांनी आनंद आणि उत्साहाने साजरा केला.

यावेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील व भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांना उपस्थित महिलांनी औक्षण केले. मंत्री चंद्रकांत पाटील व धीरज घाटे यांच्या हस्ते उपस्थित सर्व महिला भगिनींना भाऊबीज भेट म्हणून साडी भेट देण्यात आली. यावेळी दोघांनी सर्व महिलांना दीपावली निमित्त शुभेच्छा दिल्या.



भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मंदार बलकवडे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे व विविध उपक्रमांचे मंत्री चंद्रकांत पाटील व धीरज घाटे यांनी कौतुक केले.



यावेळी भाजपा कोथरूड मंडल सरचिटणीस गायत्री लांडे, कुणाल तोंडे, शंतनू खिलारे, शिवाजी शेळके, श्रीकांत गावडे, अमोल डांगे, चेतन धाडवे, गणेश थरकुडे, संतोष लांडे, सुलभा जगताप, संगिता शेवडे, अविनाश बलकवडे, विनय सुभेदार, अभिषेक दळवी, वैभव धापसे, प्रणव गरूडकर, अनुज मुळीक, साजिद तांबोळी, सुदर्शन मोतीवाले, ऋषिकेश देव्हडे, रोहन ढमाले, रोहित सुतार, अतुल सणस, सुधाकर राऊत, सागर सुतार, रोहित बलकवडे यांच्या सह भाजपा व देशप्रेमी मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






