पुणे शहर

पुण्यात घरगुती पाईप गॅसची संख्या वाढविण्यासाठी विशेष मोहीम; पीएनजीआरबीच्या राष्ट्रीय मोहिमेत एमएनजीएलचाही सक्रिय सहभाग

पुणे : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) ने देशात पाईपद्वारे घरगुती गॅसपुरवठा वाढवा; यासाठी विशेष राष्ट्रीय मोहिमेची घोषणा केली आहे. २६ जानेवारी ते ३१ मार्च देशव्यापी मोहीम हाती घेण्यात आली असून; एमएनजीएलनेही यात सक्रिय सहभागी होत, ताथवडे येथील ॲनस्टिन काऊंटी सोसायटीत विशेष उपक्रम राबवला. यामध्ये नागरिकांमध्ये पीएनजीबाबत जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे, या मोहिमेअंतर्गत एमएनजीएलने ग्राहकांसाठी विशेष योजना देखील कार्यान्वित केली आहे. 

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरला पर्याय म्हणून पाईप नॅचरल गॅस (PNG) ला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. याद्वारे केंद्र सरकार अनेक भागात गॅस कनेक्शन देत असून; त्यासाठी विशेष योजनाही आखण्यात येत आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) शहरी विशेष करुन महानगरातील नैसर्गिक गॅस वितरण कंपन्यांच्या सहकार्याने २६ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये घरगुती पाईप नॅचरल गॅस (PNG) च्या वापराला प्रोत्साहन देणे आणि देशभरातील PNG ग्राहकांची संख्या वाढवण्यावर विशेष भर दिला आहे. 

Img 20230717 wa0012281298961742807603730839

‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’कडून (एमएनजीएल) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांसाठी आणि घरगुती वापरासाठी नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. सध्या हडपसर, मगरपट्टा, विमाननगर, कोथरूड, मॉडेल कॉलनी, वारजे, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड) एरंडवणे, पिंपरी, नेहरूनगर, अजमेरा, चिखली, मोशी, चिंचवड, चाकण, हिंजवडी आणि वाकड या भागांत गॅस पुरवठा करण्यात येतो.

PNGRB च्या सुचनेनुसार एमएनजीएलनेही पीएनजी सेवेच्या जनजागृतीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. ताथवडे येथील ॲस्टिन काऊंटी सोसायटीत पीएनजी सेवेच्या जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोसायटीतील रहिवाशांनी एमएनजीएलच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.

Img 20231109 wa001228129905032016030159557

दरम्यान, PNGRB च्या मोहिमेअंतर्गत नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एमएनजीएलने नवीन योजना कार्यान्वित केली आहे. याअंतर्गत  गॅसिफाईड सोसायटीतील रहिवाशांना एमएनजीएलच्या सेवेसाठी दोन पर्याय मिळणार आहेत. यामध्ये प्रतिदिन १ रुपयाप्रमाणे व ॲक्च्युअल गॅस वापर तितकेच शूल्क मासिक बिलाद्वारे भरता येणार आहे. तसेच, जुन्या व्यवस्थेनुसार ६५५०/-  भरूनही एमएनजीएलच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी याचा  लाभ घ्यावा, असे आवाहन एमएनजीएलच्या वतीने करण्यात आले आहे.

Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये