कडाक्याच्या थंडीत गरजूंना मिळाला उबदार ब्लँकेटचा आधार ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपक्रम

पुणे : pune पुणे शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. रस्त्याच्या कडेने फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांचे मात्र या वाढलेल्या थंडीत उबदार कपड्यांवीना हाल होत आहेत. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराच्या वतीने गरजू नागरिकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराध्यक्ष किशोर कांबळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. अनाथ व गरजू नागरिकांना शहरामध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण देण्याकरिता ब्लॅंकेटचे वाटप करून आधार देण्यात आला.

यावेळी ब्लँकेट मिळाल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मनाला समाधान देणारा होता असे किशोर कांबळे यांनी सांगितले. या प्रसंगी रमीझभाई सय्यद, विष्णुपंत सलगर, गणेश भंडारी, यश पाटील, तोसिफ पटेल, विश्वजित गायकवाड, अज्जू शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.





