पुणे शहर

कोथरूडमध्ये अपार्टमेंटची सीमाभिंत तोडत भरधाव गाडी शिरली आत..  भीषण अपघातात झाले मोठे नुकसान

कोथरूड : pune Kothrud मधील रामबाग कॉलनीत शनिवारी पहाटे भरधाव कार अपार्टमेंटची सीमाभिंत तोडून घुसल्याने झालेल्या भिषण अपघातात सोसायटीतील वाहनांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने हा अपघात रात्री उशीरा घडल्याने इतर कोणाला इजा झाली नाही. कारचा चालक मात्र गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड मधील रामबाग कॉलनीतील बेडेकर गणपती जवळ असणाऱ्या राम लक्ष्मण अपार्टमेंटची भिंत गेट तोडत, झाडाला धडकत एक कार वेगात आत घुसली. हा अपघात शुक्रवार व शनिवारच्या मध्ये रात्री २.३० च्या सुमारास घडला. या अपघातात अपार्टमेंटची सीमा भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. सोसायटीच्या आवारातील वाहनेही नुकसानग्रस्त झाली आहेत. रात्रीच्या वेळी हा अपघात घडल्याने कोणाच्या जीवावर बेतले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

या परिसरात भरधाव वेगाने चालवल्या जाणाऱ्या वाहनांबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत, मात्र पोलिस प्रशासन व वाहतूक विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच असे प्रकार या ठिकाणी घडत असल्याचे बोलले जात आहे.

या संदर्भात कोथरूड पोलिसांना संपर्क साधला असता याबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती मिळाली. अपघाताचा नक्की कारण मात्र कळू शकले नाही..याबाबत माहिती घेतली जात आहे.

Img 20250618 wa02555226425519435283235
Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये