पुणे शहर

कोथरुडमध्ये संत तुकाराम महाराजांच्या विचारावर तीन दिवसीय मंथन

तुकाराम महाराजांचे वेगळेपण जाणून घेण्याची संधी

पुणे  : संत तुकाराम महाराज बीजनिमित्त संत तुकाराम महाराज विचार व्यासपीठच्या वतीने कोथरुडमधील गांधीभवन येथे, तुका झालासे कळस या तीन दिवसीय विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर, डॉ. चैतन्य कुंटे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, पंडित यादवराज फड आदींचे विचार ऐकायला मिळणार आहेत. 

डॉ. गी प्वॉत्व्हँ अध्यासन, श्री साई एज्युकेशन ट्रस्ट, सिध्दीविनायक सेवा ट्रस्ट, संगीतोन्मेष संश्था, चेंज इंडिया फाऊंडेशन, गरीब डोंगरी संघटना, देवाशिष फाऊंडेशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  शुक्रवार दि. २९ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होणार असून सांप्रदायिक तुकाराम या विषयावर  ह.भ.प. बंडातात्या कराडकर, डॉ. चैतन्य कुंटे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे आपले विचार मांडणार आहेत.  

Img 20230717 wa0012281298961742807603730839

शनिवार दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता जनसामान्यांचा तुकाराम या विषयावर बबाबाई लायगुडे, अंजनाबाई शेडगे, कुसुम सोनवणे, लीलाबाई कांबळे, चिंतामण उतळे, प्रा. दत्ता शिंदे, सीताराम बाजारे मौखिक परंपरेचे अभ्यासक जितेंद्र मैड, पारीच्या नमिता वाईकर विचार मांडणार आहेत. रविवार दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता तुकोबांचे सांगितीक योगदान या विषयावर पंडित यादवराज फड व सहकारी अविनाश पाटील, अमोल मोरे, आनंद टाकळकर, सुनील पासलकर सादरीकरण करणार आहे. 

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक जितेंद्र मैड,  प्रा. सागर शेडगे, मारूती माने, ॲड. शिवाजी भोईटे, अनंता सुतार, सचिन धनकुडे यांनी केले आहे.

Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192
Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये