ॲड.बाळकृष्ण निढाळकर लॉ लॅब इनोव्हेशन तर्फे अभ्यास दौऱ्यासाठी लंडनला जाणार

पुणे: Pune कायद्याच्या क्षेत्रातील आधुनिक बदलांचा अभ्यास करण्याच्या लंडन दौऱ्यासाठी ॲड.बाळकृष्ण निढाळकर यांची लॉ लॅब इनोव्हेशन तर्फे निवड झालेली आहे. दिनांक 15 /10 / 2023 रोजी निढाळकर हे लंडनसाठी रवाना होणार आहेत.

ॲड. निढाळकर हे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये सुपरिचित व्यक्तिमत्व असून मागील तीन वर्षापासून वकीलीच्या क्षेत्रात त्यांनी विविध केसेसच्या माध्यमातून आपला ठसा उमटलेला आहे. लंडन येथील दौऱ्यात ते ॲड.असीम सरोदे यांच्यासोबत विविध लॉ युनिव्हर्सिटी मधील कार्यक्रमात सहभागी होतील. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन , रॉयल कोर्ट ऑफ जस्टीस मधील कामकाज लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तसेच लंडनच्या सुप्रीम कोर्टला ते भेट देतील.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले आंबेडकर हाऊस येथे तसेच पार्लमेंट स्क्वेअर मधील गांधी पुतळा येथे भेट देऊन नक्कीच प्रेरणा मिळेल आणि लंडनमधील कोर्टातील आधुनिक कामकाज पद्धती बघून भारतात न्यायिक आधुनिकतेची मागणी करता येईल असा विश्वास ॲड. बाळकृष्ण निढाळकर यांनी सिंहासन न्यूजशी बोलताना व्यक्त केला.












