खाद्यसंस्कृती

दुध महागले : अमूलच्या दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ

मुंबई : अमूलच्या दुधाच्या दरात लिटरमागे भारतभर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या किमती 1 मार्च 2022 पासून लागू होतील. अमूल गोल्डची किंमत 30 रुपये प्रति 500 मिली असेल. दुसरीकडे, अमूल ताजाची किंमत 24 रुपये प्रति 500 मिली तर अमूल शक्तीची किंमत 27 रुपये प्रति 500 मिली असेल.

Img 20220225 wa00038702747946855041624

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दुधाच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी जुलै 2021 मध्ये दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर ही दरवाढ लागू होणार आहे. यामध्ये टी-स्पेशल, सोना, ताजा, शक्ती याशिवाय गाय आणि म्हशीचे दूध इत्यादींचा समावेश आहे. तब्बल सात महिने 27 दिवसांनी दरात वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ हेच किमती वाढण्याचे कारण असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

या दरवाढीवर अमूलने सांगितले की, 2 रुपयांची वाढ ही प्रति लीटरच्या वाढीमागे अन्नधान्याच्या सरासरी महागाईपेक्षा खूपच कमी आहे. गेल्या दोन वर्षांत अमूलने आपल्या ताज्या दुधाच्या श्रेणीत दरवर्षी 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. ऊर्जा, पॅकेजिंग, वाहतूक आणि पशुखाद्य यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे, एकूण कामकाजाचा खर्च वाढला आहे. हे पाहता अमूलने शेतकऱ्यांचा दूध खरेदी दर 35 रुपयांवरून 40 रुपये प्रति किलो केला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्के अधिक आहे. दुधाच्या खरेदीवर भरलेल्या प्रत्येक रुपयापैकी सुमारे 40 पैसे शेतकऱ्यांना परत केले जातात, असे अमुलने म्हटले आहे.

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये