पुणे शहर

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात ब्राह्मण समाज आक्रमक ब्राह्मण विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुण्यात आंदोलन

अजूनही यांचा ब्राह्मण विरोध संपत नाही.- दवे

पुणे : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सिंधुदुर्ग येथे ब्राह्मण विरोधी भाष्य केले आहे.त्याचा ब्राह्मण महासंघ निषेध करीत आहे.अशा प्रकारे वक्तव्य करणारा कोणीही असो त्याच्या विरूद्ध निषेध आक्रमकपणे ब्राह्मण महासंघ करणार आहे. अशी प्रतिक्रिया ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिली आहे.

दवे म्हणाले, आज शुक्रवारी १२ वाजता पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन  येथे मोठ्या संख्येने जमून निषेध नोंदवून जो पर्यंत पाटील विधान मागे घेत नाही व ब्राह्मण समाजाची माफी मागत नाही तो पर्यंत तीव्र आंदोलन करणार आहोत.भाजप श्रेष्ठी कडे पाटलांविरूद् कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येणार आहे.

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020

ब्राह्मण महासंघ कधीही कोणतेही आंदोलन स्वतः चा बॅनर लावून करीत नाही.हे वक्तव्य हा पूर्ण ब्राह्मण समाजाचाच अपमान आहे असं आम्ही मानतो, असंच वक्तव्य त्यांनी मराठा समाजाबत केले असते का याचा विचार सर्वांनी करायचा आहे.

Img 20201213 wa0074

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये