पुणे शहर

‘एचएसआरपी’ नंबर प्लेटसाठी शुल्क भरण्याकरिता या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन..

पुणे : वाहनधारकांनी वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविताना http://transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच शुल्क भरण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी hsrp number plate बसविणे अत्यावश्यक आहे.

Screenshot 20250710 110010 whatsapp3933075104028335025

या निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या वाहनांना एचएसआरपी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनधारकांनी वाहनांवर एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहनही भोसले यांनी केले आहे.

Img 20250508 wa0001235733770892078245
Img 20250704 wa03105141954843688917612
Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये