
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे शहर विद्यार्थी कार्यकारणीच्या पद नियुक्त्यांचा कार्यक्रम पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी श्रीकांत बालघरे तसेच कार्याध्यक्षपदी ऋषिकेश कडू यांची निवड करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी श्रीकांत बालघरे तसेच कार्याध्यक्ष पदी ऋषिकेश कडू यांची निवड करण्यात आली.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रवक्ते अंकुश काकडे, यांच्यासह पुणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थीचे अध्यक्ष विक्रम जाधव, कार्याध्यक्ष शुभम माताळे, यश कुलकर्णी उपस्थित होते तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




