कोथरुड

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाने अशी केली संत गाडगेबाबा जयंती साजरी….!                   

कोथरुड : कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी कोथरूड गावठाण हजेरी कोठी अंतर्गत संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त
स्वच्छता अभियान प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन- २०२२ अन्वये कमिन्स इंडिया लिमिटेड, जनवाणी सहकारी संस्था, सेवा सहयोग फाउंडेशन, स्वच्छ सहकारी संस्था, क्रिश डान्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता अभियानचे व प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला  आरोग्य निरीक्षक करण कुंभार व सचिन लोहकरे यांनी पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सदर प्रचार फेरी डहाणूकर कॉलनी, श्रावणधारा वसाहत, बधाई चौक, भेलकेनगर चौक शिवाजी पुतळा चौक, कर्वे  पुतळा चौक व कोथरूड गावठाण परिसर या ठिकाणी काढण्यात आली. 

महत्त्वाचा संदेश देणारा पुणे महापालिकेचा हा व्हिडिओ जरूर पहा..

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाचा विद्यार्थी मैलारी खर्ची या विद्यार्थ्याने  स्वच्छतेवर एक पात्री पथनाट्य सादर केले.  या अभिनयातून नागरिकांना सार्वजनिक रस्त्यावर थुंकू नये, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, नदी नाले प्रवाह स्वच्छ ठेवणे, तसेच सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता व निगा राखण्याची जबाबदारी नागरिकांनी स्वतः अंगीकारली पाहिजे, असा संदेश देण्यात आला.

सर्वांनी स्वच्छता अभियानात आठवड्यातून दोन तास सहभागी होऊन स्वच्छता मोहिमेमध्ये नागरिकांनी सामील होऊन संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश देण्याचे आवाहन यावेळी  करण्यात आले. तसेच पथनाट्याच्या माध्यमातून  रस्त्यावर थुंकणाऱ्या व व्यसन करणाऱ्या मुन्नाभाईना गुलाब पुष्प देऊन उपरोधिकपणे सत्कार करण्यात आला. व सार्वजनिक रस्त्यावर न थुंकण्यासाठी समज देण्यात आली. वसुंधरेची हरित कायदा शपथ यावेळी  नागरिकांना देण्यात आली.

सदर कार्यक्रम महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार मोकादम वैजीनाथ गायकवाड, अण्णा ढावरे, जवानीचे समीर आजगेकर,जयश्री पाटील, नीता नाईक, जगन्नाथ ढगे, श्री चाबुकस्वार, क्रिश डान्स अकॅडमीचे कृष्णा शिंदे, परविन शिंदे .इत्यादींनी प्रचार फेरी आयोजित करण्यास परिश्रम घेतले.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये