बांधकाम विश्वात खऱ्या अर्थाने विश्वासाचं नातं जपणारे बढेकर ग्रुप : शशिकांत सुतार

कोथरुडमध्ये बढेकर ग्रुपच्या श्रीधर कृपा बांधकाम प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा संपन्न
पुणे : बांधकाम विश्वात खऱ्या अर्थाने विश्वासाचं नातं जपणारा ग्रुप म्हणून आज बढेकर ग्रूपकडे पाहिले जाते. एवढा नम्रपणा मी कोणत्या बांधकाम व्यायासायिकामध्ये पाहिला नाही. आज त्यांचे अनेक मोठे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत ते केवळ त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासाच्या नात्यामुळेच, असे गौरवोद्गार माजी कृषी मंत्री शशिकांत सुतार यांनी काढले.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बढेकर ग्रुपच्या वतीने कोथरुडमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ, भेलकेनगरमध्ये सुरू करण्यात आलेल्या बढेकर शैलीतील “श्रीधर कृपा” या बांधकाम प्रकल्पाचा शुभारंभ माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, बढेकर ग्रुपचे संस्थापक केशव बढेकर, चेअरमन प्रवीण बढेकर, बढेकर ग्रूपचे पार्टनर पृथ्वीराज सुतार तसेच नानासाहेब भेलके, दादासाहेब भेलके व इतर मान्यवर उपस्थित होते.

शशिकांत सुतार पुढे म्हणाले, सर्वात जास्त वेगाने विकसित झालेले उपनगर म्हणून कोथरुडचे नाव गिनीज वर्ल्डबुकमध्ये नोंद आहे. आगोदर ड्रेनेज लाईन व नंतर रस्ते अशा पद्धतीने कामे करण्यात आल्याने कोथरुडचा विकास नियोजित पद्धतीने झाला. म्हणूनच आज पुणे शहरात राहण्यासाठी लोक सर्वात जास्त पसंती कोथरुड भागाला देत आहेत. ७० च्या दशकात ज्या काही कोथरुड मध्ये महापालिका सँक्शन इमारती होत्या त्यापैकी श्रीधर कृपा ही एक होती. त्यावेळीही माझ्याच हस्ते या इमारतीचे भूमिपूजन झाले होते व आता रिडेव्हलपमेंटच्या कमाचेही माझ्याच हस्ते भूमिपूजन होत आहे हा योगायोगच म्हणावा लागेल.
प्रवीण बढेकर म्हणाले की, आज बढेकर ग्रुपचे ३० लाख चौरस फुटांचे काम सुरू आहे ते केवळ कोथरूडकरांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच. या बांधकाम व्यवसायाच्या वाटचालीत अनेकांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यांच्या मिळालेल्या साथीमुळे आज ग्राहकांशी विश्वासाचे नाते जपत बढेकर ग्रुपची वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत वेळेत बांधकाम प्रकल्प पूर्ण करून देण्याच्या आमच्या वैशिष्ट्याप्रमाणे याही प्रकल्पाचे काम वेळेतच पूर्ण करून दिले जाईल. ज्यावेळी माझी शशिकांत भाऊंशी ओळख झाली त्यावेळी त्यांनी मला रिडेव्हलपमेंटमध्ये लक्ष घालण्याबाबत सल्ला दिला होता. त्यांचा सल्ला एकल्यानेच आज आम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये विश्वसनीय काम केले आहे.
यावेळी गायक जितेंद्र भुरुक यांच्या हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात छोटा सा घर होगा बादलोंकी छाव में , झिलमिल सितारोंका आंगण होगा, दिलं है छोटासा छोटीसी आंशा या सादर झालेल्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. गणेश वंदनेने या दिमाखदार शुभारंभ सोहळ्याची सुरुवात झाली.
श्रीधर कृपा बांधकाम प्रकल्पाची वैशिष्ठ्ये
२ व ३ बीएचके फ्लॅट्स, डुप्लेक्स फ्लॅट, चिल्ड्रन्स प्ले एरिया, टेरेस गार्डन, कॉन्फरन्स रूम, थिएटर, सुरक्षेच्या दृष्टीने सर्व अद्ययावत यंत्रणा, प्रशस्त पार्कींग.
बढेकर ग्रूपकडेच घर का घ्यावे..
नाते विश्वासाचे हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणाऱ्या बढेकर ग्रूपने आजपर्यंत आपल्या अनेक ग्राहकांना आनंदाच्या वास्तू निर्माण करून दिल्या आहेत. आणि त्या ग्राहकांबरोबर त्यांचे विश्वासाचे नाते मजबुतपणे आजही टिकून आहे, आणि याच विश्वासाच्या जोरावर बढेकर ग्रूपचे १२ मोठे गृहप्रकल्प कोथरुडमध्ये आज सुरू आहेत. त्यामध्ये आता श्रीधर कृपा या गृह प्रकल्पाची भर पडत आहे. बढेकर शैलीतील घर म्हणजे स्वप्नांना आकार देणारं घर असं म्हंटले जाते. घर घ्यायचे तेही अशा ठिकाणी जिथे नाते विश्वासाचे जपले जाते, म्हणजेच बढेकर ग्रुप शिवाय पर्याय नाही. त्यामुळे घर घेण्याचा विचार करत असाल तर आजच आपल्या जीवनातील सुखांचा शुभारंभ करण्यासाठी आणि सुखी जीवनाचा आशीर्वाद लाभलेलं घर घेण्यासाठी तयार व्हा आणि बढेकर ग्रुपच्या श्रीधर कृपा या बांधकाम प्रकल्पाला भेट देऊन आपलं घर घेण्याचं स्वप्न साकार करा.
‘बढेकर ग्रुप’ या नावाने २००९ पासून बांधकाम व्यवसायामध्ये त्यांच्या या प्रवासाला सुरुवात झाली. ‘नाते विश्वासाचे’ हे ब्रीदवाक्य वापरत त्यांनी सामान्यांना परवडतील अशी घरे बांधून दिली. अत्यंत कमी काळामध्ये लोकांचा विश्वास संपादन करत आज अग्रगण्य बांधकाम व्यावयायिकांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. आत्तापर्यंत त्यांनी २५ प्रकल्प पूर्ण केले आहेत. १० प्रकल्पांवर सद्य:स्थितीला काम सुरू आहे, तर आगामी काळात वेगवेगळे २५ प्रकल्प बढेकर ग्रुपच्या माध्यमातून साकारले जाणार आहेत. बढेकर ग्रुप यांनी पाच कुटुंबापासून सुरुवात केली होती, आज १८४० कुटुंब बढेकर ग्रुपशी जोडली गेली आहेत. गेल्या अकरा वर्षांत त्यांनी जोडलेली माणसे अतिशय सुखा समाधानाने त्यांनी बांधलेल्या घरांत राहत आहेत. पुढच्या पाच वर्षांत २००० लोकांना घरे देण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
‘वस्तू विकण्यापेक्षा वास्तू विकावी’ अशी प्रवीण बढेकर यांची विचारसरणी आणि दूरदृष्टी यामुळेच ‘बढेकर ग्रुप’ नावलौकिकास आला आहे.
या गृह प्रकल्पाच्या माहितीसाठी ७९९२८०८०८० व ७८१०८०८०८० या क्रमांकावर संपर्क करू शकता किंवा वर दिलेल्या बांधकाम साईटवर व बढेकर ग्रुपच्या ऑफिस नं ३०३ मयूर ११ , कर्वे पुतळ्याजवळ कोथरुड पुणे ३८ या कॉर्पोरेट ऑफिसला भेट द्या.






