पुणे शहर

भोर इंडस्ट्रीजच्या वतीने पुणे पोलिसांना बॅरिकेड भेट..

पुणे : pune city नाकाबंदी व पोलीस बंदोबस्त लावताना आवश्यक असलेले लोखंडी बॅरिकेड वारजे पोलिस स्टेशनला भोर इंडस्ट्रीजच्या वतीने भेट म्हणून देण्यात आले आहेत. Barricade Gift to Pune Police on behalf of Bhor Industries ..

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, भोर इंजिनिअरिंगचे संजय भोर, निरीक्षक गुन्हे अमृत मराठे, पीएसआय पालवे, शुभम भोर, पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी तसेच असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. असाच उपक्रम उत्तमनगर पोलिसांसाठी ही राबविणार असल्याची माहिती असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.

पोलीस हा समाजातील महत्वाचा घटक असून व्यवसायिकांनी उत्पन्नातील खारीचा वाटा अश्या सामाजिक उपक्रमांसाठीही राखीव ठेवावा असे आवाहन संजय भोर यांनी या प्रसंगी केले. सर्व बॅरिकेड बनवून तयार केले असून उत्तमनगर पोलिसांना देखील एक दोन दिवसात ते सुपूर्द करण्यात येतील, अशी माहिती भोर यांनी दिली. यावेळी निरीक्षक शंकर खटके यांनी आभार मानले.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये