पुणे शहर

बावधन बुद्रुकचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार ; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन

भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नांना यश

बावधन : बावधन बुद्रुकचा पाणीप्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागणार असून नागरिकांना रोज पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या लाईन चे जाळे तयार केले जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याकडून पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता त्याला यश मिळाले आहे.

बावधन मध्ये पुणे महापालिकेच्या माध्यमातून २३ कोटी खर्चून समान पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. यामध्ये 34 किलोमीटर बावधन बु. अंतर्गत पाण्याच्या लाईनचे जाळे तयार केले जाणार आहे. हे काम लवकरच पूर्ण होऊन बावधनचा कायमचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.

याप्रसंगी माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाण्याच्या लाईनसाठी सर्व रस्ते खोदले जाणार आहेत तरी आम्हाला परत रस्ते करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली, त्यावर पाटील यांनी त्यास होकार देत निधी देण्याची हमी दिली व बावधन बु. गावाला हक्काचे मैदान मिळण्यासाठी जी गायरान जमीन आहे त्याचा स्वतः पाठपुरावा करून तुम्हाला ते मैदान म्हणूनच मिळेल यासाठी प्रयत्न करेल व यापुढे विकासासाठी जे काही निधी लागल तो मी 100% देण्याचा प्रयत्न करेन असे त्यांनी सांगितले.

Img 20230327 wa0002

याप्रसंगी नगरसेवक श्री. किरण दगडे पाटील, सरपंच पियुषा किरण दगडे पाटील,नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे- पाठक,संघटन सरचिटणीस श्री. धर्मेंद्रजी खांडरे,मा. उपसरपंच तानाजी आण्णा दगडे पाटील, मा.पोलीस पाटील बबनराव दगडे पाटील, मा. सरपंच राहुलजी दुधाळे,मा. सरपंच राजू भुंडे, राजेंद्रजी बांदल, मा. उपसरपंच श्री. दिपालीताई दगडे,गोरखजी दगडे, वैभव मुरकुटे,सुनिल दगडे पाटील, धंनजय दगडे पाटील, मयुर कांबळे, सुनिल बांदल,बावधन ग्रामस्थ, समस्थ वारकरी संप्रदाय, सोसायटीमधील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये