पुणे शहर

शिक्षण, सुसंस्कार आणि प्रयत्न यामुळेच विद्यार्थी जीवनात उत्तुंग यश प्राप्त करतील : भरत पिंगळे

सद्गुरु श्री वामनराव पै, जीवन विद्या मिशन कोथरूड शाखा कर्वेनगर संतसंघ केंद्र यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : शिक्षण, सुसंस्कार आणि प्रयत्नामुळेच विद्यार्थी जीवनात उत्तुंग यश प्राप्त करतील असे विचार व्यक्त करतानाच जीवन घडत असताना विचारांचं महत्व कसं आहे याविषयी मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै (sadguru shri Wamanrao Pai) यांचे सतशिष्य भरतजी पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना केले. Jeevanvidya mission

सद्गुरु श्री वामनराव पै, जीवन विद्या मिशन कोथरूड शाखा कर्वेनगर संतसंघ केंद्र यांच्यावतीने संस्कार शिक्षण अभियान उपक्रम अंतर्गत घेण्यात आलेल्या खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेच्या महत्मा गांधी विद्यालय शाळेमध्ये हायस्कुल व ज्यूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जीवन विद्येचं मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.

तूच आहेस तुज्या जीवनाचा शिल्पकार हा दिव्य संदेश स्पष्ट करून तो आचरणात कसा आणायचा याचे मार्गदर्शन करतानाच सद्गुरु श्री वामनराव पै यांनी सांगितलेले अभ्यासाबाबतीतील 3R फॉर्म्युला, अभ्यासाचं तंत्र वाचन, ग्रहण आणि लेखन त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. जीवन घडत असताना विचारांचं महत्व कसं आहे याविषयी मार्गदर्शन केलं.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र कृषी पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे, मुख्याध्यापक म्हाळसाकांत खेडेकर, दीपककुमार यादव, रवींद्र कदम, शंकर भुरे, काळुराम वाघ, गणेश सातपुते, उल्हास गोरड आदि उपस्थित होते. या प्रसंगी ५०० विद्यार्थ्यांना सद्गुरु श्री वामनराव पै यांचं विद्यार्थ्याना मार्गदर्शन जीवन विद्येचं हें ग्रंथ सतशिष्य गणेश निम्हण यांच्यातर्फे भेट देण्यात आलं. जीवन विद्येचं राष्ट्रगीत व विश्वप्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन शिक्षक शशिकांत जाधव यांनी केलं तर प्रा. सचिन थोपटे यांनी आभार मानले.

Img 20220910 wa0003
Img 20220924 182515 453

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये