महाराष्ट्र

पुणे विभागातील 13 लाख 58 हजार 702 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी- विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे विभागात कोरोना बाधित 14 लाख 96 हजार 758 रुग्ण

पुणे : पुणे विभागातील 13 लाख 58 हजार 702 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 लाख 96 हजार 758 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 8 हजार 988  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 29 हजार 68 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.94 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.78 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


पुणे जिल्हा
            पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 95 हजार 524 रुग्णांपैकी  9 लाख 33 हजार 99 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 46 हजार 428 आहे. कोरोनाबाधित एकूण   15 हजार 597 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.61 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  93.73 टक्के आहे.

Img 20210522 wa0203

सातारा जिल्हा
              सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 48  हजार 739 रुग्णांपैकी 1 लाख 25  हजार 614 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 20 हजार 345 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 780 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
              सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 45  हजार 120 रुग्णांपैकी  1 लाख 26  हजार 44 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15  हजार 307 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 769 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Img 20210524 wa0011

सांगली जिल्हा
               सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण  1 लाख 9  हजार 424 रुग्णांपैकी   92 हजार 872 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 380 आहे.  कोरोनाबाधित एकूण 3 हजार 172 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
            कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 97 हजार 951 रुग्णांपैकी 81 हजार 73 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 528 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 350 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 9 हजार 607 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 88, सातारा जिल्ह्यात 2 हजार 83, सोलापूर जिल्ह्यात  1 हजार 536, सांगली जिल्ह्यात 1 हजार 126  तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 774 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 15 हजार 841 आहे. पुणे जिल्हयामध्ये 7 हजार 918, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 691, सोलापूर जिल्हयामध्ये 2 हजार 180, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 589 व कोल्हापूर जिल्हयामध्ये  1 हजार 463 रुग्णांचा समावेश आहे.

विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 25 लाख 46 हजार 949, सातारा जिल्ह्यामध्ये 6 लाख 94 हजार 922, सोलापूर जिल्हयामध्ये 4 लाख 92 हजार 132, सांगली जिल्हयामध्ये 6 लाख 56 हजार 665 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 लाख 30 हजार 1 नागरिकांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण  82 लाख 80 हजार 778 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  14 लाख 96 हजार 758 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 23 मे 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये