पुणे शहर

भाजपा खडकवासला मतदार संघ पश्चिम मंडलाची कार्यकारणी जाहीर..

पुणे : भारतीय जनता पक्ष पुणे शहर खडकवासला मतदार संघ पश्चिम मंडलाची कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली. खडकवासला मतदार संघ पश्चिम मंडलाचे अध्यक्ष ॲड. गणेश वरपे यांनी ही कार्यकारणी मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर, भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात जाहीर केली.

यावेळी भाजप पश्चिम महाराष्ट्र महामंत्री मकरंद देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ११ वर्षाच्या वाटचालीची माहिती दिली. या ११ वर्षाच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशात केलेली प्रगती, राबवलेले विकास प्रकल्प, राबवलेल्या विविध कल्याणकारी योजना देशपांडे व खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी उपस्थितांना दिली. यावेळी माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील, किरण बारटक्के, भाजप सहकार आघाडी पुणे शहराचे माजी अध्यक्ष सचिन दांगट , माजी नगरसेविका अल्पना वरपे, आदी उपस्थित होते.

Img 20250508 wa0001235733770892078245

खडकवासला मतदार संघाच्या पश्चिम मंडलामध्ये बावधन, डावी व उजवी भुसारी कॉलनी, वारजे माळवाडी असा भाग येतो.

अशी आहे खडकवासला मतदार संघ पश्चिम मंडलाची कार्यकारणी

उपाध्यक्ष

  • गणेश कोकाटे,
  • मीनल भरते,
  • योगेश लिमये,
  • भरत मराठे,
  • निखिल वाशीवाले,
  • प्रसाद कफने

सरचिटणीस :

  • वैभव मुरकुटे,
  • चेतन गोंडाळ

चिटणीस :

  • ॲड विठ्ठल वांजळे,
  • अमरजा पटवर्धन,
  • ज्ञानेश्वर ठाकर,
  • राहुल जाधव,
  • नितीन भुंडे,
  • ऋषिकेश राजावत

कोषाध्यक्ष : अजय ढाकणे

उर्वरित कार्यकारणी १ जुलै नंतर जाहीर केली जाणार आहे.

Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये