राष्ट्रीय

मनमोहन सिंग यांचं नितीन गडकरींकडून कौतुक, म्हणाले “आपण त्यांचे ऋणी, त्यांच्यामुळेच…”

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं कौतुक केलं आहे. आर्थिक सुधारणांसाठी आपण मनमोहन सिंग यांचे ऋणी असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. नितीन गडकरी यांनी भारताला गरिबांना फायदा देणाऱ्या उदारमतवादी आर्थिक धोरणाची गरज आहे असल्याचं मत मांडलं.

Img 20221108 wa03111149523490358263271

“उदारमतवादी आर्थिक धोरणामुळे देशाला नवी दिशा मिळाली. यासाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे,” असं सांगत नितीन गडकरी यांनी कौतुक केलं. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांमुळेच आपण १९९० दरम्यान महाराष्ट्रात रस्ते निर्माण करताना निधी उभारु शकलो असं यावेळी त्यांनी सांगितलं. उदारमतवादी आर्थिक धोरण शेतकरी आणि गरीबांसाठी असल्याचं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

Img 20221107 wa00246242446261228342920

नितीन गडकरी यांनी यावेळी चीनचाही उल्लेख केला. उदारमतवादी आर्थिक धोरण देशाच्या विकासात कशाप्रकारे मदत करतं याचं चीन हे उत्तम उदाहरण असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी अधिक कॅपेक्स गुंतवणुकीची गरज असल्याचं मत गडकरींनी यावेळी मांडलं.

Img 20221107 wa00231753521829434315593

नितीन गडकरींनी यावेळी राष्ट्रीय महामार्ग उभे करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) सर्वसामान्यांकडून पैसा गोळा करत असल्याचं सांगितलं. आपलं मंत्रालय २६ हरित राष्ट्रीय महामार्ग उभे करत असून, त्यासाठी निधी कमी पडत नसल्याची माहिती गडकरींनी यावेळी दिली.

Screenshot 2022 11 08 17 30 12 863027856036357080963
Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये