चांदणी चौकात पुन्हा ब्लास्ट आणि वाहतूक कोंडी हे आहे कारण…

पुणे:चांदणी चौकात पुन्हा ब्लास्ट करण्यात आला आहे. पुण्याच्या चांदणी चौकात आता टेकडीसाठी दोन छोटे ब्लास्ट केले जाणार आहेत. त्यापैकी आज दुपारी बारा वाजता पहिला ब्लास्ट करण्यात आला. या दरम्यान चौकात एक तासांचा ब्लॉक घेतला गेला आहे. त्यामुळे चांदणी चौकात पुन्हा वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. हा ब्लास्ट टेकडी हटवण्यासाठी केला गेला आहे. 22 होल्समध्ये भरलेल्या स्फोटकांच्या आधारे हे कार्य पूर्ण केलं जाणार आहे. यासाठी मुंबईहून बंगळुरुच्या दिशेने जाणारा मार्ग दुपारी एक ते दोनच्या दरम्यान बंद ठेवण्यात येईल. असे सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर अद्यापही बंगळुरु-मुंबई मार्गावरुन दोन्ही दिशेची वाहतूक सुरळीत झाली नाही.
यानंतर दुसरी टेकडी हटविण्याची तयारी करावी लागणार आहे. ती टेकडी हटवण्यासाठी देखील असाच एक ब्लास्ट केला जाणार आहे. त्यासाठी ही ब्लॉक घेण्याचं नियोजन आखण्यात आलं आहे. आधी सायकांळी वाहतुकीचा अंदाज घेण्यात येईल आणि त्यावर पुढचा ब्लॉक आज घ्यायचा की उद्या याचा निर्णय घेण्यात येणार आहे.










