महाराष्ट्र

भोंग्यांच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक; राज ठाकरे…

मुंबई : राज्याच्या गृहविभागामार्फत भोंग्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. भोंग्यांसदर्भात राजकीय पक्षांच्या भूमिका समजून घेत राज्य सरकारची भूमिका काय आहे हे या बैठकीत मांडलं जाणार आहे. मात्र या बैठकीला राज ठाकरे उपस्थित नसणार आहेत,अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

मनसेच्या वतीने या बैठकीला मनसेचे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित राहणार असल्याचंही मनसेनं स्पष्ट केलं आहे. सरकारची भूमिका विरोधी पक्षांबरोबरच सत्ताधारी घटक पक्षांपर्यंत पोहचवण्याचा हेतू या बैठकीच्या माध्यमातून साध्य करण्याचा गृहमंत्रालयाचा प्रयत्न आहे.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये