कोथरुड

कोथरूड मध्ये नाना पटोले यांच्या हस्ते विद्यार्थी काँग्रेस (NSUI) शाखेचे उद्घाटन

कोथरूड मधील युवकांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

कोथरूड : कोथरूड मधील आझादनगर येथील राज जाधव यांच्या कोथरूड विधानसभा विद्यार्थी काँग्रेस NSUI शाखेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते जल्लोष पूर्ण वातावरणात करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पटोले यांचे कोथरूड मध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस NSUI अध्यक्ष अमीरभाई शेख, प्रदेश उपाध्यक्ष उमेश कंधारे, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष आरविंद शिंदे, पुणे शहर विद्यार्थी काँग्रेस NSUI अध्यक्ष भूषण रानभरे आदी उपस्थित होते. यावेळी २५ युवकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. काँग्रेस हा पक्ष कायमच सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करणारा पक्ष आहे त्यामुळे पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा असे मार्गदर्शन पटोले यांनी कार्यकर्त्यांना केले. चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी राज जाधव यांचे अभिनंदन केले.

Img 20220910 wa0003

या प्रसंगी नाना पटोले यांच्या हस्ते कोथरुड विधानसभा विद्यार्थी काँग्रेस NSUI अध्यक्ष राज गोविंद जाधव यांच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रफुल्ल पिसाळ, हनमंत पवार, प्रसन्न मोरे, राजू मगर, संजय मानकर, किशोर मारणे, महेश विचारे, संदीप मोकाटे, शारदा विर, मनिशा करपे, प्रेरणा गायकवाड, महेश कांबळे, उमेश ठाकूर, विश्वास खवळे, शालानी चव्हाण, सलीम आगा, निहाल शेख, तेजस गाढवे, प्रतिक पानसरे, शुभम पानकर, हिमांशू देठे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कोथरुड विधानसभा विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष राज गोविंद जाधव यांनी केले होते.

Img 20220924 182515 453

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये