पुणे शहर

पुणे वाहतूक पोलिसांचा सर्वात मोठा निर्णय, खासगी बससाठी नवीन मार्ग

पुणे : वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खासगी बसचे मार्ग, थांबे आणि वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय पुणे वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. खासगी बसला जाण्यासाठी मार्ग व थांबे निश्चित करून देण्यात आले आहेत. खासगी बसला ठरवून दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गावर प्रवेश दिला जाणार नाही. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, यावर १५ दिवसांत हरकती नोंदविण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी नेमून दिलेल्या थांब्यावर फक्त तीन मिनिटेच बस उभी करण्याची वेळ देण्यात आली आहे.

मित्रमंडळ चौक व पद्मावती येथून सातारा रस्ता मार्गे जाणाऱ्या बस व्होल्गा चौक-मार्केट यार्ड, सातारा रस्ता, पद्मावती, कात्रज चौक, नवले पूल आणि नवीन कात्रज बोगदा या मार्गाने जातील. या मार्गावर मित्रमंडळ चौक व कात्रज सर्पोद्यान फक्त हेच थांबे राहतील.

Img 20250508 wa00015038950216212096978

संगमवाडी पार्किंग येथून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या बस संगमवाडी, सादलबाबा चौक, आंबेडकर चौक, गोल्फ चौक, शास्त्रीनगर चौक, वाघोली या मार्गाने जातील. या मार्गावर खराडी बायपास आणि वाघेश्वर पार्किंग हे दोन थांबे राहतील.

संगमवाडी पार्किंग येथून नाशिक रोडकडे जाणाऱ्या बस संगमवाडी, सादलबाबा चौक, चंद्रमा चौक, मुळा रस्ता, पोट्री फार्म चौक, हॅरिस पूल, नाशिक रस्ता या मार्गाने जातील. या मार्गावर थांबा नाही.

संगमवाडी येथून मुंबईकडे जाणाऱ्या बस संगमवाडी, सादलबाबा चौक, चंद्रमा चौक, मुळा रस्ता, पोल्ट्री फार्म चौक, हॅरीस पूल, निगडीमार्गे जुना पुणे-मुंबई महामार्गाने जातील.

वारजे जंक्शन येथून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या बस आंबेडकर चौक, कर्वे रस्ता, पौड फाटा, एसएनडीटी, लॉ कॉलेज, एसबी रोड, पुणे विद्यापीठ चौक, संचेती, इंजिनीअरिंग कॉलेज, संगमवाडी पार्किंग, सादलबाबा चौक, आंबेडकर चौक, गोल्फ चौक, शास्त्रीनगर चौक, वाघोली या मार्गाने जातील.

मुंबई ते अहिल्यानगर रस्त्यावरील बससाठी मार्ग हरिस पूल, जुना मुंबई-पुणे महामार्ग, हायवे पोल्ट्री फार्म चौक, मुळा रस्त्याने आंबेडकर चौक, आळंदी रोड जंक्शन, गोल्फ कल्ब चौक, शास्त्रीनगर चौक-वाघोली. या मार्गावर संगमवाडी, खराडी बायपास, वाघेश्वर पार्किंग हे थांबे राहतील.

मुंबई ते सोलापूर रस्ता जुना मुंबई-पुणे महामार्ग, हॅरिस पूल, पोल्ट्री फार्म चौक, आळंदी रोड जंक्शन, आंबेडकर चौक, गोल्फ क्लब चौक, शास्त्रीनगर चौक, खराडी बायपास, मुंढवा, मगरपट्टा-हडपसर मार्गे सोलापूर रस्ता. या मार्गावर संगमवाडी, खराडी बायपास, शेवाळवाडी हे थांबे राहतील.

मुंबई ते सातारा रस्ता पुणे शहरातून प्रवेश नाही (नो एंट्री); परंतु पुणे-बेंगळुरू बायपासमार्गे बाणेर, चांदणी चौक, वारजे, वडगाव पूल, नवले पूल-नवीन कात्रज बोगद्यातून साताऱ्याकडे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये